Ad will apear here
Next
गजेंद्र अहिरे यांचा हिंदी कवितासंग्रह लवकरच; ‘बुकगंगा’तर्फे होणार प्रकाशित

पुणे : संवेदनशील दिग्दर्शक म्हणून परिचित असलेले गजेंद्र अहिरे हे उत्तम लेखक, कवी, गीतकारही आहेत. त्यांनी लिहिलेल्या हिंदी कविता, गझल यांचे ‘आधा पागल’ हे पुस्तक ‘बुकगंगा’तर्फे लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. गजेंद्र अहिरे यांच्या ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या पन्नासाव्या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) या पुस्तकाची घोषणा करण्यात आली. या वेळी ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर उपस्थित होते. या पुस्तकाची झलक दाखविणारी चित्रफीत सादर करून याबाबत माहिती देण्यात आली. टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांनी याचे स्वागत केले. 

कोथरूडमधील सिटीप्राईड चित्रपटगृहात झालेल्या या प्रीमिअरसाठी चित्रपटातील बालकलाकार अथर्व बेडेकर, पियुष, निखील रत्नपारखी यांच्यासह वृंदा अहिरे, चित्रपटाचे निर्माते विनय आणि स्मिता गानू, संगीतकार नरेंद्र भिडे, तंत्रज्ञ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

(पुस्तकाच्या ट्रेलरचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)





BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZSMCG
Similar Posts
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
‘राजसन्मान’ एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी २३-२४ नोव्हेंबरला पुणे : ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोथरूड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजसन्मान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार, दि. २३ व रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी लोकायत सभागृह येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language